आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ असं टाईप व सर्च केलं, तर काय होतं?
आपण जर गूगल वर ‘आत्महत्या’ सर्च केलं किंवा फेसबुकवर ‘आत्महत्या‘ संबंधित पोस्ट लिहिली तर सर्च इंजिन हा शब्द Google वर शोधतात आणि आपल्या स्क्रीनवर 9152987821 हा फोन नंबर दिसतो. त्याबरोबर ‘मदत मिळू शकते, आज समुपदेशकाशी बोलू शकता’ असा मजकूर लिहून येतो.
हा नंबर मुंबईस्थित स्वयंसेवी संस्था आयकॉलच्या (iCALL) कॉल सेंटरचा आहे. आयकॉलची सुरुवात २०१२ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ ह्युमन इकोलॉजीने केली. देशातील प्रत्येक नागरिकासाठी मानसिक आरोग्याची सुविधा उपलब्ध करणे हा यामागील उद्देश होता. 2018 मध्ये आयकॉल मेंटल हेल्थ पार्टनर म्हणून Google आणि फेसबुकशी जोडला गेला.
25 प्रोफेशनल मानसिक आरोग्य समुपदेशक वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयकॉल बरोबर काम करतात. सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत हिंदी आणि इंग्रजीसह मराठी, पंजाबी, मल्याळम, बांगला, कन्नड अशा अनेक स्थानिक भाषांमध्ये समुपदेशन करतात.




