This Simple Finger Test Could Reveal Signs of Lung Cancer and Other Health Conditions

बोटांची ‘ही’ सोपी टेस्ट सांगेल तुम्हाला कर्करोगाचा धोका तर नाही ना? जाणून घ्या…

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

आपण बोटांची एक छोटीशी चाचणी करून आपल्या आरोग्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. फुफ्फुसांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे यातून दिसू शकतात. ही चाचणी सोपी असून घरी केली जाऊ शकते. ही बोटाची चाचणी करण्याचा लोकांना आग्रह केला जात आहे, कारण यामुळे संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही चाचणी आपल्याला फिंगर क्लबिंग असल्यास म्हणजे बोटांना सूज येणे आणि आणि नखांच्या खालील त्वचा मऊ होणे हे दर्शवू शकते. हे अनेक अंतर्निहित आरोग्य स्थितींचे लक्षण असू शकते, विशेषत: फुफ्फुसांवर किंवा हृदयावर परिणाम करणारी लक्षणं, ज्यात फुफ्फुसांचा कर्करोग आणि मेसोथेलिओमा (एक दुर्लभ प्रकारचा कॅन्सर) यांचा समावेश होतो. नॉन-स्मॉल सेल फुफ्फुसांचा कर्करोग असलेल्या 35 टक्क्यांहून अधिक लोकांना फिंगर क्लबिंगचा अनुभव येतो, असे कॅन्सर रिसर्च यूकेने सांगितले आहे.

फिंगर क्लबिंग म्हणजे काय?
फिंगर क्लबिंग सहसा दोन्ही हातांच्या बोटांच्या वरच्या भागावर परिणाम करते. याचा बोटांवर देखील परिणाम होऊ शकतो. हे टप्प्याटप्प्याने होताना दिसते.

  • सुरुवातीला नखांचा बेस मऊ पडणे, नखांभोवती त्वचेचा लालसरपणा (एरिथेमा)
  • नखांचा बेस आणि नखांच्या खालची त्वचा यांच्या दरम्यानचा कोन वाढतो, ज्यामुळे नखे नेहमीपेक्षा जास्त वळलेली दिसतात.
  • नखे आणि नखांच्या सभोवतालची त्वचा चमकदार दिसते. नखे बाजूकडून पाहिल्यास सामान्यपेक्षा जास्त वक्र दिसतात.
  • बोटांची टोकं मोठी दिसतात. ज्याला बर्‍याचदा “ड्रमस्टिक बोट” असे संबोधले जाते.

फिंगर क्लबिंग असल्यास कसे ओळखाल?

एक अतिशय सोपी चाचणी आहे, ज्याला स्कॅमरॉथ विंडो टेस्ट म्हणतात. विंडो गॅप टेस्ट करून हे समजू शकते. तुमची तर्जनी किंवा अंगठ्याची नखे एकत्र दाबा आणि त्यांच्यामध्ये हिऱ्याच्या आकाराची एक लहान खिडकी दिसते का ते पहा. जर तुम्हाला मध्ये थोडीही जागा दिसत नसेल तर शक्य आहे की तुम्हाला फिंगर क्लबिंग आहे.

बोटांच्या मऊ उतींमध्ये द्रव गोळा झाल्यामुळे क्लबिंग होते असे मानले जाते. हे नेहमीपेक्षा जास्त रक्त वाहून नेण्यामुळे होते. परंतु असे कशामुळे घडते हे शास्त्रज्ञांना पूर्णपणे समजलेले नाही. हे ट्यूमरमुळे निर्माण होणाऱ्या विशिष्ट केमिकल किंवा हार्मोन्समुळे होऊ शकते. फिंगर क्लबिंग असामान्य आहे. जर तुम्हाला ते असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोललेले कधीही चांगले. ते तुमची तपासणी करून इतर लक्षणांबद्दल शोधू शकतात.

कॅन्सर रिसर्चनुसार, हृदय किंवा फुफ्फुसांच्या समस्या असलेल्या लोकांव्यतिरिक्त हे थायरॉईड समस्या किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोहन रोग सारख्या इतर समस्या असलेल्या काही लोकांमध्ये देखील आढळू शकते.

 

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत