Flyover Collapses In Mumbai's Bandra Kurla Complex

मुंबईः बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला; 14 मजूर जखमी

महाराष्ट्र मुंबई

मुंबईः मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल परिसरात शुक्रवारी पहाटे बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने काही मजूर पूलावर उपस्थित होते. त्यावेळी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या पूलाचा एक गर्डर खाली कोसळला. यावेळी मजूर खाली कोसळले. या सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या व मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे 4:40 वाजता घडली. “बीकेसी मुख्य रस्ता आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा एक भाग पहाटे साडेचारच्या सुमारास कोसळला. 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी नाही आणि कोणीही बेपत्ता नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत