NZ Team Call Off Pakistan Tour Minutes Before First ODI

न्यूझीलंड क्रिकेट संघाने रद्द केला पाकिस्तान दौरा, सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी घेतला निर्णय

क्रीडा

रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. किवी क्रिकेट बोर्डाने रावळपिंडी येथे पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी हा निर्णय घेतला. या दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामने खेळले जाणार होते. न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त सूचना (intelligence alert) मिळाली होती. आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानमधून बाहेर काढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हा दौरा पार पाडण्यासाठी पाकिस्तानने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनाही फोन करून सुरक्षेचे पूर्ण आश्वासन दिले होते. इम्रान खान म्हणाले होते की, पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा असून किवी संघाला कोणताही धोका नाही. तथापि, हे आश्वासन देखील कामी आले नाही आणि न्यूझीलंडने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार होता, म्हणजेच टॉस दुपारी 2.30 वाजता होणार होता, पण एकही टीम हॉटेलच्या बाहेर आली नाही. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्येच राहण्यास सांगण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत