शारजा : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.
नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या डावाची सुरूवात खराब झाली. नितीश राणा शून्यावर बाद झाला. त्यानंतर शमीने राहुल त्रिपाठी (७) आणि दिनेश कार्तिकला (०) माघारी धाडलं. त्यानंतर शुबमन गिल आणि कर्णधार मॉर्गन यांनी दमदार ८० धावांची भागीदारी केली. मॉर्गनने २५ चेंडूत ४० धावा केल्या. मॉर्गन बाद झाल्यावर पुन्हा कोलकाताच्या डावाला गळती लागली. पण शुबमन गिलने आपलं अर्धशतक (५७) पूर्ण केलं. त्यामुळे कोलकाताला १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद शमीने ३, जॉर्डन, बिश्नोईने २-२ तर मुरुगन अश्विन, मॅक्सवेलने प्रत्येकी १ बळी टिपला.
Half-centuries from Gayle (51) and Mandeep (66*) guide @lionsdenkxip to an 8-wicket win over #KKR
Scorecard – https://t.co/Ye2Tx7iO5Z #Dream11IPL pic.twitter.com/BLL2LAvxsw
— IndianPremierLeague (@IPL) October 26, 2020
किंग्स इलेव्हन पंजाबकडून एल राहुल २५ चेंडूत २८ धावा करुन वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. मनदीप सिंह याने नाबाद राहून विजयात मोठी भूमिका बजावली. मनदीप सिंहने ५६ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. त्याला ख्रिस गेलने उत्तम साथ दिली. गेलने फक्त २९ चेंडूत ५१ धावा केल्या. तो लोकी फर्ग्युसनच्या चेंडूवर प्रसिध कृष्णाकडे झेल देऊन परतला. निकोलस पूरनने नाबाद २ धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची मॅच ८ विकेट राखून जिंकली.
किंग्स इलेव्हन पंजाबच्या विजयामुळे १२ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी झाले. आता पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तीन टीमचे प्रत्येकी १४ पॉइंट्स आहेत. रनरेटच्या आधारे मुंबई इंडियन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाब १२ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. आधी चौथ्या स्थानावर असलेली कोलकाता नाईट रायडर्सची टीम १२ पॉइंट्ससह पाचव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स १० पॉइ्ट्ससह सहाव्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबाद ८ पॉइंट्स आणि चांगल्या रनरेटसह सातव्या स्थानावर तर चेन्नई सुपरकिंग्स ८ पॉइंट्ससह शेवटच्या, आठव्या स्थानावर आहे.
#KXIP makes its way in the Top 4 in the Points Table after Match 46 of #Dream11IPL pic.twitter.com/PlCAYG6k9R
— IndianPremierLeague (@IPL) October 26, 2020