विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी IPLमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, पण मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
पंजाबविरूद्ध झालेल्या सुपर ओव्हरमध्ये त्याच्या स्नायूंची दुखापत झाली. गेले दोन सामने स्नायूंच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा संघाबाहेर आहे. त्याच्या जागी संघात सौरभ तिवारीला स्थान देण्यात येत आहे तर संघाचे नेतृत्व कायरन पोलार्ड करत आहे. रोहितची दुखापत सध्या तरी गंभीर वाटत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आलेले नाही. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीबाबत BCCIची वैद्यकीय समिती लक्ष ठेवून आहे, अशी माहिती BCCIकडून देण्यात आली आहे.
NEWS – Four additional bowlers – Kamlesh Nagarkoti, Kartik Tyagi, Ishan Porel and T. Natarajan – will travel with the Indian contingent.
The BCCI Medical Team will continue to monitor the progress of Rohit Sharma and Ishant Sharma. #AUSvIND
— BCCI (@BCCI) October 26, 2020
टी२० संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती
कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज
एकदिवसीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर