म्युनिच : जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचा शनिवारी म्युनिचमध्ये युगांडाच्या हमजा वांडेराशी सामना करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ३८ वर्षांचे होते. बॉक्सिंग जगताने आणखी एक स्टार गमावल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या बातमीची पुष्टी करण्यासाठी तुर्कीच्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर माहिती दिली.
“आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामाक, अलुक्राचा बॉक्सर, ज्याने युरोपियन आणि आशियाई चॅम्पियनशिप जिंकली, हृदयविकाराच्या झटक्याने तरुण वयात गमावले,” असे तुर्की अधिकारी हसन तुरान यांनी ट्विटरवर सांगितले.
Avrupa ve Asya şampiyonlukları olan Alucralı boksör hemşehrimiz Musa Askan Yamak’ı bir kalp krizi sonrasında genç yaşında kaybettik.
Daha önce müsabaka için Ankara’ya geldiğinde TBMM’de görüştüğümüz merhuma Allah’tan rahmet, kederli ailesine ve sevenlerine başsağlığı diliyorum. pic.twitter.com/KXhiMeBoA2— Hasan Turan ???? (@hasanturantr) May 15, 2022
दुसऱ्या फेरीत यामाक यांना वांदेरा सोबतच्या लढतीत जोरदार झटका बसताना दिसला, ज्यानंतर बॉक्सरने तिसर्या फेरीत परत लढण्याचा प्रयत्न केला परंतु फेरी सुरू होण्यापूर्वीच तो कोसळला. यामाक यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळाली पण त्यांना वाचवता आले नाही. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Devastating Moment Champion Boxer Collapses and Dies from Heart Attack (Warning: Distressing Video)
Undefeated Turkish-German boxer Musa Yamak collapsed as he tried to come out for the 3rd round of his 9th professional bout near Munich, Germany. pic.twitter.com/RSzeDO6s9J
— ?Nikos ?????? (@CyprusNik) May 17, 2022
38 वर्षीय मुसा यामाक 2017 मध्ये या प्रोफेशनमध्ये आले आणि 2021 मध्ये WBFed आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकल्यानंतर ते प्रसिद्ध झाले.




