पाकिस्तान : पाकिस्तान सध्या कडक उन्हाचा सामना करत आहे. तेथे अनेक भागात पारा 50 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे अबोटाबादच्या जंगलात भीषण आग लागली आहे. दरम्यान, लाखो फॉलोअर्स असलेल्या पाकिस्तानी टिकटोकर हुमैरा असगरने असाच एक प्रकार केला आहे, ज्याबद्दल सोशल मीडिया यूजर्सने तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी हुमैराने कथितरित्या जंगलाला आग लावली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये ती जळत्या जंगलासमोर पोज देतानाही दिसत आहे. ‘मी जिथे राहते तिथे आग असते,’ असे कॅप्शन तिने व्हिडिओला दिले होते. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टिकटॉक स्टार हुमैराला चौफेर टीकेला सामोरे जावे लागले आहे.
टिकटॉकर हुमैरा हिने नुकताच जळत्या जंगलात स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्येही खळबळ उडाली आहे. व्हिडिओसाठी जंगलाला आग लावल्याचा आरोप लोकांनी हुमैरावर केला आहे. मात्र, हुमैराच्या मॅनेजरने मीडियासमोर स्पष्टीकरण दिले की ही आग हुमैराने लावली नव्हती. यासोबतच जंगल जळत असताना व्हिडीओ बनवण्यात काहीही गैर नसल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, वाद वाढत असल्याचे पाहून हुमैराने हा व्हिडिओ डिलीट केला आहे.
दरम्यान, पर्यावरण कार्यकर्त्या आणि इस्लामाबाद वाइल्डलाइफ मॅनेजमेंट बोर्डाच्या अध्यक्षा रीना सईद खान यांनीही याप्रकरणी हुमैराची निंदा केली आहे. याविषयी म्हटले आहे की, ‘आगीला ग्लॅमर देण्याऐवजी त्यांनी ती विझवण्यासाठी पाण्याची बादली ठेवायला हवी होती.’ याविषयी शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हुमैरावर कारवाई करण्याची मागणीही लोकांनी केली आहे. या पोस्टवर ट्विटर यूजर्स संताप व्यक्त करत आहेत. काही लोकांनी व्हिडिओमध्ये हुमैराच्या या कृत्याला वेडेपणाही म्हटले आहे.
This tiktoker from Pakistan has set fire to the forest for 15 sec video.
Government should make sure that culprits are punished and the tiktoker along with the brand should be penalised. #Pakistan #TikTok pic.twitter.com/76ad77ULdJ
— Discover Pakistan ?? | پاکستان (@PakistanNature) May 17, 2022




