बीजिंग : चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने मुलांना जन्म देण्यावरची मर्यादा उठविली आहे. याअगोदर चीनमध्ये जास्तीत जास्त दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती, परंतु आता जास्तीत जास्त मुलांची संख्या तीन करण्यात आली आहे. ही माहिती येथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. चीनमध्ये सोमवारी घोषणा करण्यात आली की आता देशातील प्रत्येक जोडप्याला दोन नव्हे तर तीन मुलांना जन्म देता येईल. अध्यक्ष शी चिनफिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत या धोरण बदलास मान्यता देण्यात आली आहे.
चीनच्या जनगणनेच्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की गेल्या दशकात चीनच्या कामगार प्रवर्गातील लोकसंख्या कमी झाली आहे, तर 65 वर्षांपेक्षा जास्त लोकांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्था व समाजावर झाला आहे. 1980 पासून जन्ममर्यादा लागू आहे, जी देशातील सत्ताधारी पक्षाने लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी निश्चित केली आहे. परंतु आता चीनमध्ये कार्यक्षम गट कमी होणे ही एक चिंतेची बाब बनली आहे.
2015 मध्ये चीनने आपले दशकांपूर्वीचे जुने एक मूल जन्माला घालण्याचे धोरण रद्द केले आणि दोन मुलांचे धोरण लागू केले होते. परंतु, मुलांच्या संगोपनावर जास्त खर्च होत असल्यामुळे लोकांनी ते स्वीकारले नाही. यामुळे लोकसंख्या कमी झाली. या महिन्याच्या सुरूवातीस, चीनच्या एका दशकातल्या जनगणनेत असे दिसून आले आहे की १९५० च्या दशकानंतर मागील दशकात लोकसंख्या सर्वात कमी दराने वाढली आहे.
चीन सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या जनगणनेच्या सातव्या राष्ट्रीय आकडेवारीनुसार, चीनची लोकसंख्या 1.41178 अब्ज झाली आहे, ही संख्या २०१० च्या आकडेवारीपेक्षा ५.8 टक्के किंवा ७.२ कोटी जास्त आहे.




