world no tobacco day over 80 million people died each year worldwide due to tobacco

तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात

तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

World no tobacco Day : जगभर तंबाखूचे सेवन ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी, जगभरातील 80 लाखाहूनही अधिक लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. केवळ भारतातच तंबाखूमुळे दरवर्षी १३ लाखाहून अधिक लोक मरत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूचे सेवन सोडविण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी एक टूलकिट जाहीर केली आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने 27 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात सांगितले आहे की लोक आजारी पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखूचा वापर किंवा धूम्रपान आहे.

सिगारेटमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नवीन अभ्यासात समोर आले धक्कादायक निष्कर्ष

WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात 130 कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यापैकी ८०% तंबाखू सेवन करणारे लोक मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांमध्ये राहतात. अहवालानुसार, तंबाखू दरवर्षी जगभरात 80 लाखाहून अधिक लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. तर, अशी तब्बल १२ लाख माणसे आहेत जे तंबाखूच्या धुराच्या संपर्कात असतात किंवा कधीकधी जे मित्रांबरोबर किंवा इतरांबरोबर सामायिक करुन त्याचे सेवन करतात.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, दरवर्षी तंबाखू आणि धूम्रपान केल्यामुळे भारतात सुमारे १३,००,000 मृत्यू होतात. ते म्हणाले की, मागील वर्षांच्या भारतातील अभ्यासातून असे दिसून आले आहे की तंबाखू सेवन करणार्‍यांच्या संख्येत 6% घट झाली आहे. ती संख्या 34.6% वरून 28.6% वर आली आहे.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले की तंबाखू आणि विशेषत: धूम्रपान करणार्‍यांना कोरोनाचा धोका 40 ते 50% पर्यंत अधिक जीवघेणा ठरतो. यामुळे केवळ फुफ्फुस, हृदय आणि कर्करोग यासारखेच आजार उद्भवत नाहीत, तर शरीराच्या प्रत्येक भागावर दुष्परिणाम देखील होतात. ते म्हणाले की चांगल्या आरोग्यासाठी तंबाखू आणि धूम्रपान टाळणे फार महत्वाचे आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत