to reduce side effect of corona vaccine you should eat healthy food

कोरोना लस घेतल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

नवी दिल्ली : कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लस घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ही लस केवळ आपली प्रतिकारशक्तीच वाढवते असं नाही, तर कोरोना झाल्यास काही गंभीर परिस्थिती ओढवण्यापासून आपले संरक्षण देखील करते. काही लोक लशीच्या दुष्परिणामांमुळे लस घेण्यास घाबरतात. काही लोकांना लस घेतल्यानंतर हात दुखणे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा आणि थकवा असे काही दुष्परिणाम २-3 दिवसांपर्यंत जाणवू शकतात. परंतु, आपण आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

 1. भरपूर पाणी प्या
  लस घेतल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. यामुळे लसीचे साईड इफेक्ट होण्यास जबाबदार घटक शरीराबाहेर फेकण्यास मदत होते.
 2. हिरव्या पालेभाज्या
  हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, प्रोविटामिन ए, कॅरोटीनोईड्स, फोलेट, मॅंगनीज इत्यादी असतात. हे सर्व पोषकतत्वे चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवण्यात आणि थकवा दूर करण्यास मदत करतात. लसीकरणानंतर हिरव्या पालेभाज्यांचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे.
 3. हळद
  हळद अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, एंटी-इंफ्लेमेटरी, एनाल्जेसिक आणि एंटी-फंगल या गुणधर्मांनी समृद्ध असते, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. लस मिळाल्यानंतर हळदीचे सेवन केल्यास अंगदुखी आणि वेदना कमी होतील आणि थकवा जाणवणार नाही.
 4. आले (अदरक) रोग प्रतिकारशक्ती वाढवते
  आल्यामुळे अन्नाची चव तर वाढतेच, पण त्यात औषधी गुणधर्मही असतात. अमीनो ऍसिड्स आणि एन्झाईमने समृद्ध असलेले आले (अदरक) तणावातून मुक्त करते, तसेच मनाला शांत करते. आपण चहामध्ये आल्याचा वापर करू शकता.
 5. शरीराला हायड्रेटेड ठेवणारे पदार्थ खा
  लसीकरणानंतर शरीराला हायड्रेटेड ठेवतील असे पदार्थ खा. त्यासाठी लसीकरणानंतर आपण आपल्या आहारात संत्री, खरबूज, काकडी असे पदार्थ समाविष्ट करायला हवे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत