न्यूयॉर्क : कोरोना विषाणू आणि त्याच्या नवीन स्ट्रेन्सने संपूर्ण जगासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. आता लॅटिन अमेरिकी देशांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. त्यास लॅम्बडा असे नाव देण्यात आले आहे. WHO ने सध्या सर्व देशांना लॅम्बडा व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कारण जर तो अधिक वेगाने पसरला तर चिंतेत भर पडणार आहे. कारण अगोदरच अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटमुळे सध्या जगात खळबळ उडाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक बुलेटिनने सांगितले की लॅम्बडा व्हेरियंट प्रथम पेरूमध्ये सापडला होता. परंतु आता तो जगातील 29 देशांमध्ये पसरला आहे. पण त्याचा सर्वात जास्त परिणाम लॅटिन अमेरिकन देशांमध्ये झाला आहे. यामध्ये पेरू, अर्जेंटिना, चिली आणि इक्वाडोर या देशांचा समावेश आहे. यावर्षी एप्रिलपर्यंत पेरूमध्ये कोरोनाव्हायरस संबंधित सर्व प्रकरणांपैकी 81 टक्के प्रकरणं लॅम्बडा व्हेरिएंटमधील आहेत. चिलीमधील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 32 टक्के प्रकरणे या प्रकारातील आहेत. डब्ल्यूएचओला चिंता वाटत आहे की हा लॅम्बडा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आणि जास्त धोकादायक ठरू शकतो. तसेचच तो अँटीबॉडीजला देखील धोका देऊ शकतो.
Lambda has been associated with substantive rates of community transmission in multiple countries (Peru, Chile, Argentina), with rising prevalence over time concurrent with increased COVID-19 incidence.https://t.co/5UBylmyE7W
— Humberto Debat (@humbertodebat) June 15, 2021




