Actor Kishor Shetty

ABCD या चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अटक

मनोरंजन

कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अभिनेता किशोर शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ड्रग्स सोबत बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या सिटी क्राईम ब्रांचने प्रसिद्ध नर्तक आणि ABCD या चित्रपटातील अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोरने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता ज्यामुळे तो चर्चेत आला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बॉलिवुडमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरु आहे. नारकोटिक्स ब्यूरोने रिया चक्रवर्तीसह अन्य १० जणांना अटक केली आहे. त्यातच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही ड्रग पेडलिंगची प्रकरणे समोर आल्यानंतर सेंट्रल क्राईम ब्रांचने कारवाई सुरू केली आहे. सीसीबीने किशोर शेट्टीसह दोघांना ड्रग्ससह अटक केली आहे. या दुसऱ्या व्यक्तीचे नाव अकील नौशील असे आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत