fir filed against bhushan kumar the t series head in alleged rape case

टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मुंबई : टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमारने आगामी प्रकल्पात नोकरी देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा दावा एका महिलेने केला आहे. याप्रकरणी भूषण कुमार यांच्याविरूद्ध मुंबईच्या डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, भूषण कुमार याच्याविरोधात भारतीय दंड संहिताच्या कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबईतील डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मुंबई पोलिसांकडून भूषणकुमार यांचा जबाब नोंदविला जाण्याची अपेक्षा आहे. पीडित महिला ही 30 वर्षीय असल्याची माहिती मिळाली आहे.

भूषण कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील कामांसाठी ओळखले जातात. वडील गुलशनकुमार यांच्या हत्येवेळी 1997 मध्ये भूषण कुमार यांचे वय 19 वर्ष होते. त्यावेळी त्यांनी टी-सीरिज या संगीत कंपनीचा ताबा घेतला आणि काम सुरु केले. २००१ साली ‘तुम बिन’ या चित्रपटासह भूषण कुमार यांनी चित्रपट निर्मितीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भूल भुलैया, रेडी आणि आशिकी 2 सारखे हिट चित्रपट दिले. त्यानंतर कुमार यांनी यारीया, हेट स्टोरी 3, एअरलिफ्ट, हिंदी मीडियम, तुम्हारी सुलु, सोनू के टीटू की स्वीटी, बत्ती गुल मीटर चालू, सत्यमेव जयते, दे दे प्यार दे आणि कबीर सिंह अशा प्रकल्पांसाठी काम केलेले आहे.

ब्रेकिंग : ‘बालिका वधू’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत