Indian Navy two women officers

भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच युद्धनौकेवर तैनात होणार दोन महिला अधिकारी

देश महिला विशेष

भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंह या दोघीही आयएनएस गरुडा या युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या पायलेट म्हणून ऑन बोर्ड काम करतील. युद्धनौकेवर तैनात होणाऱ्या भारतीय नौसेनेच्या या पहिल्या महिला अधिकारी ठरतील. यापूर्वी केवळ समुद्रकिनाऱ्यांवरुन उडून पुन्हा परतणाऱ्या हेलिकॉप्टरच्या तुकड्यांमध्ये महिलांचा समावेश केला जात होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ले. कुमुदिनी आणि ले. सिंग या दोघी १७ सदस्य असणाऱ्या तुकडीचा भाग आहेत. या गटामध्ये भारतीय नौदलाचे अधिकारी असून त्यापैकी चार महिला अधिकारी, तीन भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी भारतीय नौदलाकडून कोच्ची येथे आयएनएस गरुडावर घेण्यात आलेला ऑबझरव्हर कोर्स पूर्ण केला आहे. यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या या सर्वांना आज (सोमवार) सन्मानित करण्यात आलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत