caretaker throws 13 month old girl broken bones

कोरोनाच्या लक्षणांकडे आईने केलं दुर्लक्ष, 14 दिवसांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

कोरोना देश

गुजरात : गुजरातच्या सूरत शहरात कोरोनाने अवघ्या 14 दिवसांच्या चिमुकलीचा बळी घेतल्याची दुःखद घटना घडली आहे. डॉक्टरांनी चिमुकलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर प्लाझ्मा थेरपीचा देखील वापर करण्यात आला. मात्र, चिमुकलीचा मृत्यू झाला. या बाळाला जन्मानंतर दोन दिवसात कोरोनाची लागण झाली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चिमुकलीच्या आईला आधीपासूनच कोरोनाची लक्षणे जाणवत होती. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष केले. तिच्या या चुकीमुळे जन्मानंतर दोन दिवसात बाळाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर सूरतच्या वराछा येथील डायमंड रुग्णालयात या बाळावर उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सूरतमध्ये गेल्या 30 दिवसात 10 वर्षांखालील 286 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत तीन चिमुकल्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच, लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट जास्त धोकादायक असल्याचं मत तज्ज्ञ वारंवार मांडत आहेत. त्यामुळे आता नवीन चिंता सर्वांना भेडसावत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत