Husband dies of corona, woman commits suicide with three-year-old child

नवऱ्याचं कोरोनामुळे निधन, महिलेची तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या

नांदेड महाराष्ट्र

नांदेड : नांदेडच्या लोह शहरात एका महिलेनं आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. नवऱ्याचं कोरोनामुळे निधन झाल्यामुळे या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. या महिलेने तिच्या दोन मुलींना घरी ठेवलं आणि तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर गदम (40) लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत होते. मंगळवारी शंकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर लोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्‍यान त्यांचा मुत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. त्यातच तिने लहान मुलासह शहराजवळच्या सुनेगाव तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत