दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज (गुरुवार) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात अमित शहा हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेण्याची शक्यता आहे.
टॅग: union home minister
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रुग्णालयात दाखल; श्वसनास त्रास
दिल्ली: अमित शाह यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे काल (शनिवार) रात्री उशिरा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (Aiims Hospital) दाखल (Admitted) करण्यात आलं आहे. रुग्णालयाकडून अद्याप यासंदर्भात कोणतेही मेडिकल बुलेटीन देण्यात आलेले नाही. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या क्षणी त्याची […]

