Marathi films will enrich the theater sector – Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar

मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्राला समृद्ध करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : महाराष्ट्रातील रंगभूमी व चित्रपट सृष्टीची भरभराट करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व सह कलाकारांचा सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी आज सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते आणि कवि किशोर कदम, निर्माते अक्षय बर्दापूरकर, दिग्दर्शक शंतनू रोडे आदी दिग्गज कलावंत यावेळी उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुनगंटीवार म्हणाले, यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या यादीत “मराठी” ने गौरवाचे स्थान मिळविले. या गुणी मराठी कलावंतांचा आज सन्मान करताना अभिमानाने ऊर भरून येत आहे. जगात भारत हा सर्वात सुंदर देश आहेच ; सोबतच आमचा जन्म ज्या महाराष्ट्रात झाला ती मायभूमी गुणवान आणि कर्तुत्ववान आहे. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने चित्रपट भारतीयांसमोर आणला. पहिला चित्रपट देखील मराठी, राजा हरिश्चंद्र; त्यामुळे या क्षेत्रात मराठीचे मोठे स्थान आहे. श्यामची आई, सोंगाड्या, पिंजरा या चित्रपटांची परंपरा आणि वैविध्यता अतुलनीय आहे. ही परंपरा आपण कायम ठेवू, नाट्य मंदिरे उत्तम करुन रंगभूमी निश्चित संपन्न करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभिनेते किशोर कदम, शंतनू रोडे यांनीदेखील मनोगत व्यक्त करुन सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे अभिनंदन केले व हा सोहळा आयोजित केल्याबद्दल आभार मानले. आरोह वेलणकर यांनी संचालन केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत