Gang rape of a minor girl
क्राईम देश

काकाकडून तरुणीवर वारंवार बलात्कार, अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून केले ब्लॅकमेल…

चंदीगड : हरियाणाच्या जींदमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्काराचा आरोपी हा पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्यावर या तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गढी पोलीस ठाण्यात तिच्या नात्यातील आरोपी काकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, ओलीस ठेवणे, अंमली पदार्थ देणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलीस स्टेशन नरवाना परिसरातील एका मुलीने उचाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत माहिती दिली की ती रोहतक येथे शिकते. तक्रारीनुसार, डिसेंबर 2018 मध्ये ती त्याच गावातील तिचे काका गुरविंदर यांच्यासोबत तिच्या घरी परतत होती. दरम्यान, जिंद बसस्थानकावर बस बदलत असताना गुरविंदरने तिच्यासाठी पाण्याची बाटली आणली होती, त्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर तिची प्रकृती खालावली. यानंतर आरोपी काकाने मुलीला बळजबरीने त्याचा मेव्हणा आझाद याच्या घरी नेले, तिथे गुरविंदरने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओही बनवला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिचा लैंगिक छळ सुरूच ठेवला आणि व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन पैसे उकळले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत