चंदीगड : हरियाणाच्या जींदमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्काराचा आरोपी हा पीडितेचा नातेवाईक आहे. त्याच्यावर या तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गढी पोलीस ठाण्यात तिच्या नात्यातील आरोपी काकाविरुद्ध लैंगिक अत्याचार, ओलीस ठेवणे, अंमली पदार्थ देणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

