The reason for the decrease in sexual desire in many women

स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा कमी होण्याचं ‘हे’ असू शकतं कारण, संशोधकांनी सांगितलं…

लाइफ स्टाइल

बर्‍याच स्त्रियांचा दिवसेंदिवस लैंगिक संबंधात रस कमी होत जातो. महिलांच्या लैंगिक इच्छेत होणाऱ्या या बदलांवर नुकताच एक अभ्यास केला गेला आहे. स्कॉट्सडेलच्या संशोधकांनी या विषयीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासाच्या लेखक आणि मेयो क्लिनिकमधील औषधीच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. ज्युलियाना क्लिंग यांनी संशोधनात बरीच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉक्टर क्लींग यांनी स्त्रियांच्या सेक्सबद्दल होणाऱ्या इच्छेला व्यवस्थित झोपेशी जोडलं आहे. एका नवीन अभ्यासानुसार, वाढत्या वयात चांगली झोप घेणे हा लैंगिक इच्छा वाढविण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. संशोधकांना असे आढळले की ज्या स्त्रिया चांगली झोप घेत नाहीत त्यांना लैंगिक समस्या होण्याची शक्यता दुप्पट आहे. लैंगिक इच्छा कमी होणे किंवा उत्तेजना कमी होणे. हा अभ्यास 53 वर्षे वयोगटातील 3,4०० हून अधिक महिलांवर केला गेला. यापैकी 75 टक्के स्त्रियांची झोपेची सवय चांगली नव्हती, तर ५४ टक्के महिलांमध्ये काही ना काही लैंगिक समस्या आढळली.

अभ्यासामध्ये महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल बर्‍याच गोष्टी विचारण्यात आल्या. अभ्यासात असे दिसून आले की ज्या स्त्रिया चांगली झोप घेत नाहीत, त्यांच्यात लैंगिक इच्छांचा अभाव आहे. संशोधकांनी झोप आणि लैंगिक संबंधांवर परिणाम करणाऱ्या रजोनिवृत्तीसारख्या (menopause) इतर कारणांबद्दलही माहिती घेतली.

या अभ्यासामध्ये सामील झालेल्या अशा महिला ज्या रात्री पाच तासापेक्षा कमी झोप घ्यायच्या, त्यांना लैंगिक समस्या होण्याची शक्यता जास्त होती. डॉक्टर क्लिंग म्हणाल्या कि, “सेक्शुअल डिस्फंक्शन ही एक प्रकारची लैंगिक समस्या आहे, ज्याचा संबंध कमी झोपेशी आहे. यामुळे लैंगिक इच्छा, उत्तेजनाची कमतरता आणि प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना यासारख्या समस्या होतात. चांगली झोप न घेतल्याने शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि नंतर तो थकवा आणि लैंगिक समस्यांमध्ये बदलतो. चांगली झोप घेतल्याने तुमचे लैंगिक जीवनसुद्धा चांगले होते.”

आपल्याला जर झोपेशी संबंधित काही अडचण येत असेल, तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. पूर्ण आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. नियमित झोपेचे रुटीन असेल तर लैंगिक जीवन सुधारण्यास मदत होते. डॉक्टर क्लिंग म्हणतात की चांगल्या झोपेसाठी कॅफिनच सेवन कमी करावं. शक्यतो दुपारनंतर कॉफी पिणे टाळा. बेडवर गेल्यानंतर फोन आणि कॉम्प्यूटरचा वापर करणं टाळा आणि एका ठराविक वेळी झोपायची सवय लावा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत