पुणे : भारतातील उन्हाळा वर्षानुवर्षे अधिक उष्ण होत चालला आहे. सूर्य त्वचेला गंभीरपणे टॅन करतो, त्यातच प्रदूषण, उष्ण वारे आणि विषारी द्रव्यांमुळे त्वचेचे नुकसान होते. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास नक्कीच मदत मिळेल.
चेहऱ्यावर जमा होणारा घाम आणि धूळ काढून टाकण्यासाठी आपला चेहरा वारंवार थंड पाण्याने धुवा. थंड दूध वापरणे देखील एक पर्याय आहे. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. आपली त्वचा उन्हात सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे, उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका. आठवड्यातून किमान दोनदा विशेषत: उन्हाळ्यात त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी त्वचेला एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.
त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी
- बेसन आणि दूध किंवा मलई, हळद आणि लिंबू मिक्स करून ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने चोळा आणि स्वतःच फरक पहा.
- मुलतानी माती, गुलाबपाणी आणि चंदन पावडर पुरळ असलेल्या त्वचेसाठी वापरू शकता.
- चंदन पावडर, दही आणि चिमूटभर हळद मिक्स करून ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा.
- दही आणि मध, 10 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला सुंदर आणि स्वच्छ त्वचा मिळेल.
- आपल्या त्वचेला नियमितपणे मॉइश्चरायझ करण्यास विसरू नका. तुमची त्वचा निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी एक चांगले मॉइश्चरायझर घ्या आणि ते रोज लावा. तेलकट त्वचेसाठी जेल-आधारित मॉइश्चरायझर आणि सामान्य त्वचेसाठी पाणी-आधारित मॉइश्चरायझर वापरा.
टॅनिंग काढण्यासाठी
टॅनिंग ही उन्हाळ्यातील आणखी एक मोठी समस्या आहे ज्यावर उपचार करण्यासाठी खूप प्रयत्न आणि वेळ लागतो. पण आता नाही.
- टॅन काढण्यासाठी, टोमॅटोचा रस वापरा. टोमॅटो आणि लिंबाचा रस सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगला आहे. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर या रसामध्ये थोडीशी चंदन पावडर मिसळा, जर तेलकट असेल आणि मुरुमे होण्याची शक्यता असेल तर मुलतानी माती वापरा आणि नॉर्मल त्वचा असल्यास दही आणि चंदन पावडर वापरा. सुमारे दहा मिनिटे ही पेस्ट लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
- टॅनिंगवर आणखी एक अगदी सोपा आणि जलद उपाय म्हणजे कच्चे दूध आणि बेसनाची पेस्ट तयार करा. लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला आणि गोलाकार हालचालीत चेहऱ्यावर लावा. ते काहीसे कोरडे होईपर्यंत प्रतीक्षा करा, नंतर ते धुवा. फक्त लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचर म्हणून काम करतो, जो तुमच्या टोनला देखील मदत करू शकतो. पण, त्यामुळे त्वचा कोरडी होते. म्हणूनच नंतर भरपूर मॉइश्चरायझर लावा.
सतेज आणि निरोगी त्वचेसाठी काही उपाय
- कोरफड हा उन्हाळ्यासाठी एक उत्तम उपाय आहे. कोरफडीचा रस वापरल्यास तुमचा चेहरा चमकदार आणि तजेलदार दिसेल. कोरफडीमध्ये ऑक्सीन आणि गिबेरेलिन्स अशी दोन हार्मोन्स असतात. हे दोन संप्रेरक दाहक-विरोधी गुणधर्म प्रदान करण्यासाठी जबाबदार असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.
- केळी हे आणखी एक त्वचेला अनुकूल फळ आहे. केळी मॅश करा आणि त्यात थोडे दूध किंवा अंड्याचा पांढरा भाग घाला. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर समान रीतीने लावा आणि सुमारे 20 मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवा. केळ्यामध्ये ओलावा, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे ई आणि सी असतात जे स्वच्छ चमकदार त्वचा प्रदान करण्यासाठी जबाबदार असतात.
- उन्हाळ्यात गुलाबपाणी आपल्या त्वचेसाठी फार चांगले आहे. गुलाब पाण्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते, मुरुम आणि पुरळांपासून मुक्ती मिळते. हे एक उत्कृष्ट क्लिंजर म्हणून ओळखले जाते आणि त्वचेतील तेल आणि घाण काढून टाकण्यास मदत करते.
- तुमच्या त्वचेसाठी पपई हा आणखी एक चांगला पर्याय आहे. पपई मॅश करून पेस्ट बनवा आणि त्यात लिंबाचा रस घाला. पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तशीच राहू द्या. तुम्ही पपईच्या पेस्टमध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि मध देखील घालू शकता आणि 20 मिनिटे लावू शकता. पपई त्वचेचे पोषण करण्यास मदत करते, मृत त्वचेच्या पेशी आणि निष्क्रिय प्रथिने काढून टाकण्यास मदत करू शकते.
- टरबूजाचा रस, नारळाचा रस आणि काकडीचा रस त्यांच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखला जातो. बाहेरील उष्णतेपासून त्वचेला शांत करण्यासाठी हे रस नियमितपणे चेहऱ्यावर लावा. टरबूजमध्ये व्हिटॅमिन A, B6 आणि C सोबत लाइकोपीन आणि अमीनो ऍसिड असतात, हे सर्व एकत्रितपणे निरोगी त्वचेसाठी योगदान देतात. हे रस नियमितपणे पिल्यास त्वचेला आणि आरोग्यालाही फायदा होतो.
उपयुक्त टिप्स:
- उन्हाळ्यात योग्य खाणे आवश्यक आहे. हलके जेवण, हिरव्या भाज्या आणि फळे खा, त्यात टरबूज आणि खरबूज यासारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे चांगली.
- तेलकट, मसालेदार अन्न आणि खारट, तळलेले स्नॅक्स टाळणे केव्हाही चांगले.
- भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. सहा ते आठ ग्लासेस किंवा 2 लिटर हे शिफारस केलेले प्रमाण आहे.
- चहा, कॉफी pine टाळा, त्याऐवजी ताज्या फळांचे रस, नारळ पाणी किंवा बटर मिल्कचा पर्याय निवडा. जर तुम्हाला पाण्याची चव थोडी कंटाळवाणी वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या पाण्यात लिंबू किंवा काकडीचे तुकडे, आले आणि पुदिना टाकून ते दिवसभर पिऊ शकता.




