पुणे : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, प्रदूषण, तणाव, चुकीचे आहार आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या वापरामुळे केस कोरडे, राठ आणि निर्जीव होतात. मात्र काही सोप्या आणि घरगुती उपायांनी आपण केस पुन्हा मऊ, मुलायम व आरोग्यदायी बनवू शकतो. हे उपाय नैसर्गिक असून कोणत्याही साइड इफेक्टशिवाय केसांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करतात. घरातच सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण आरोग्यदायी केस मिळवू शकतो. योग्य वेळ, संयम आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास नक्कीच तुमचे केस मऊ, मुलायम व आकर्षक बनतील.
खाली दिलेल्या काही सोप्या पण प्रभावी ट्रिक्स आपल्या दिनक्रमात सामावून घेतल्यास केस मऊ, मुलायम आणि आकर्षक बनू शकतात.
१. नारळाचं तेल (Coconut Oil) नियमित लावा
नारळाचं तेल हे केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे. यामध्ये ल्युरिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
कसं वापरायचं?
रात्री झोपण्यापूर्वी कोमट नारळाचं तेल हलक्या हाताने केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा आणि हलकं मालीश करा. सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा.
२. अंडी आणि दही मास्क
अंड्यामध्ये प्रोटीन आणि बायोटिन असतो, तर दही केसांना ओलावा (मॉइश्चर) प्रदान करतं.
कसं तयार करायचं?
- १ अंडं फोडा, त्यात २ टेबलस्पून दही मिसळा.
- हे मिश्रण केसांवर ३० मिनिटं लावा.
- नंतर थंड पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने धुवा.
- आठवड्यातून एकदा वापरा.
३. अॅलोवेरा जेलचा वापर करा
अॅलोवेरा केसांचं नैसर्गिक कंडिशनर आहे.
कसं वापरायचं?
- ताजं अॅलोवेराचं जेल काढून ते थेट केसांवर आणि स्काल्पवर लावा.
- ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा.
४. मेथी दाण्यांची पेस्ट
मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड असतो, जो केस गळती रोखतो आणि केस नरम करतो.
कसं वापरायचं?
- २ टेबलस्पून मेथी रात्री भिजवा.
- सकाळी बारीक वाटून पेस्ट तयार करा.
- केसांवर लावा आणि ३०-४५ मिनिटांनी धुवा.
५. भिजवलेले बदाम आणि दूध मास्क
बदाम केसांना पोषण देतात आणि दूध नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
कसं तयार करायचं?
- ५-६ बदाम रात्री भिजवून ठेवा.
- सकाळी त्याची पेस्ट करून त्यात थोडं दूध मिसळा.
- केसांवर २०-३० मिनिटे लावा आणि धुवा.
६. गरम तेल (Hot Oil Treatment)
कोमट तेलाने आठवड्यातून एकदा केस मालीश केल्याने केस मऊ आणि मजबूत होतात.
यासाठी आपण नारळ, बदाम, ऑलिव्ह किंवा एरंडेल (कॅस्टर) तेल हे पर्याय देखील वापरू शकता.
७. केस धुण्याची योग्य पद्धत
- जास्त गरम पाणी टाळा, कारण त्यामुळे केस ड्राय होतात.
- सौम्य, सल्फेट फ्री शॅम्पू वापरा.
- शॅम्पूमध्ये ग्लिसरीन (Glycerin) घालणं फायदेशीर ठरू शकतं किंवा केस धुतल्यानंतर 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ग्लिसरीन मिसळून हे मिश्रण केसांवर ओता व त्यानंतर टॉवेलने सौम्यपणे पुसा. (धुण्याची गरज नाही)
- केस टॉवेलने खूप घासू नका – सौम्यपणे पुसा.
८. ताक मास्क
ताक केसांना ओलावा (moisture) देऊन मऊ आणि मुलायम करतं. ताकामधील अॅसिडिक गुणधर्मामुळे डोक्यातील फंगस व बॅक्टेरिया मरतात, ज्यामुळे डेंड्रफ कमी होतो. ताक डोक्याच्या त्वचेला थंडावा देतं आणि खाज कमी करतं. ताकामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, आणि लॅक्टिक अॅसिड असल्यामुळे ते केसांना पोषण देऊन नैसर्गिक चमक देतं.
कसं तयार करायचं?
- अर्धा कप ताक, १ चमचा लिंबाचा रस, थोडंसं मध किंवा मध-तूप (ऐच्छिक)
- सगळं एकत्र करून स्काल्प आणि केसांवर लावा.
- 30 मिनिटं ठेवा आणि सौम्य शॅम्पूने धुवा.
९. स्वत:च्या आहाराकडे लक्ष द्या
केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन बी, आयर्न, झिंक यांचा समावेश असलेला संतुलित आहार आवश्यक आहे.
उपयुक्त अन्नपदार्थ: अंडी, दूध, बदाम, पालक, गाजर, अंजीर, मसूर




