eating cashew benefits high blood pressure control

काजू खाल्ल्याने शरीराला होतात अनेक फायदे, काजू खाताना घ्या ‘ही’ काळजी…

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी मेद तर असतातच, परंतु त्याचबरोबर विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. ते आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रक्तातील साखरेचे योग्यप्रकारे नियंत्रण तसेच हृदय निरोगी बनवण्यासाठी काजू फायदेशीर आहेत. काजू हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ड्रायफ्रूट आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अमेरिकेत 100 दशलक्षाहून अधिक प्रौढ उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त आहेत. 2019 मध्ये करंट डेव्हलपमेंट इन न्यूट्रिशनच्या अभ्यासानुसार, काजू खाल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. काजूचे सेवन केल्याने ट्रायग्लिसराइड्सची पातळीही कमी होते. हा रक्तातील चरबीचा एक प्रकार आहे जो स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाचा धोका वाढवू शकतो. मात्र, बाजारात मिळणारे पॅक केलेले किंवा खारट काजू रक्तदाब वाढवू देखील शकतात, त्यामुळे काजू खाताना काळजी घ्यायला हवी.

कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. एलडीएल, ज्यामुळे धमन्यांमध्ये हानिकारक फॅटी बिल्डअप होते आणि एचडीएल, जे एलडीएल कोलेस्ट्रॉल धमन्यांतून दूर करून तुमच्या हृदयाचे रक्षण करते. 2017 मध्ये अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसले आहे की आपण आहारात काजूचे सेवन केल्याने वाईट एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. एवढेच नाही तर 2018 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसले आहे की काजूयुक्त आहारामुळे चांगल्या एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.

अमेरिकेत हृदयरोग, स्ट्रोक, श्वसन रोग, मधुमेह आणि अल्झायमर मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2007 मध्ये ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की ज्यांनी आठवड्यातून चार वेळा काजू खाल्ले त्यांना हृदयरोगाचा धोका 37% कमी झाला होता. शिवाय, 2018 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळून आले की जेव्हा टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांनी 12 आठवडे 30 ग्रॅम कच्चे, अनसाल्टेड काजू खाल्ले तेव्हा त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या कमी झाल्या. एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने त्यांच रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले. काजू मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स चा एक चांगला स्त्रोत आहे, जे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

काजू खाल्ल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात तांबे मिळू शकते. संपूर्ण शरीरातील विविध कार्यांमध्ये तांबे (copper) महत्वाची भूमिका बजावते. यामध्ये हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रण, लाल रक्तपेशींचे उत्पादन, हाडांचा विकास, रक्तवाहिन्या आणि संयोजी ऊतकांचा विकास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे सक्रियकरण यांचा समावेश आहे.

काजू आणि बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. अँटिऑक्सिडंट्स अशी संयुगे आहेत जी तुमच्या शरीरात नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सला अप्रभावी करू शकतात. अशा प्रकारे अँटिऑक्सिडंट्स शरीराला रोगापासून वाचवू शकतात आणि सूज कमी करू शकतात. काजूमध्ये दोन प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यांना पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनोइड्स म्हणतात. तथापि, कच्च्यापेक्षा भाजलेल्या काजूमध्ये जास्त अँटिऑक्सिडंट असतात.

गैरसमज : काही लोकांना वाटते की काजू खाल्याने शरीराचे वजन वाढू शकते, पण तसे नाही. अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे काजू खातात त्यांचे वजन काजू न खाणाऱ्यांपेक्षा संतुलित राहण्याची शक्यता असते. कारण काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि चरबी आहे, ज्यामुळे आपल्याला दीर्घकाळ भूक लागल्यासारखे वाटत नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत