why we get hiccups, causes and remedies to get relief
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

उचकी का लागते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाय…

अनेकदा आपल्याला उचकी लागली की आपण गंमतीने म्हणतो, “कोणीतरी आठवण काढली असेल.” काही जणांची उचकी लगेच थांबते. मात्र, कधीकधी उचकी खूपच त्रासदायक ठरते. अशा वेळी उचकी थांबण्याचे काही उपाय आपण करू शकतो. आपण उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. तसेच उचकी का लागते हे देखील आपण जाणून घेणार आहोत..

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डायफ्रॅम नावाच्या मांसपेशी हृदय आणि फुफ्फुस्साला पोटापासून वेगळं करतात. उचकी तुमच्या डायफ्रॅमच्या अनैच्छिक आकुंचनामुळे उद्भवते. डायफ्रॅम तुमच्या छातीला तुमच्या पोटापासून वेगळे करतो आणि श्वास घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा या मांसपेशींचं आकुंचन वारंवार होऊ लागतं. तेव्हा आपल्याला उचकी लागते. या अनैच्छिक आकुंचनामुळे तुमच्या व्होकल कॉर्ड्स अगदी लवकर-लवकर बंद होतात, ज्यामुळे उचकीचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज निर्माण होतो. प्रत्यक्ष उचकी लागत असताना श्‍वास बाहेर पडत असतो. या वेळात श्‍वास आत घेता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थपणा जाणवतो.

उचकी लागण्याची कारणे :

  • कार्बोनेटेड पेये पिणे
  • गरजेपेक्षा जास्त खाणे
  • खूप दारू पिणे, धुम्रपान
  • उत्साह किंवा भावनिक ताण
  • तापमानात अचानक बदल झाल्याने उचकी लागू शकते
  • घाईघाईत खाल्ल्याने
  • गरम किंवा मसालेदार अन्न
  • पोटातील गॅस जो डायफ्रॅमवर दबाव आणतो.

उचकी थांबवण्यासाठी उपाय :

  1. थंड पाणी (ice-cold water) हळू हळू प्या किंवा खूप थंड पाण्याने गार्गल करा.
  2. साधारण 30 सेकंदासाठी आपल्या तोंडामध्ये साखर ठेवा आणि नंतर ती चावा आणि गिळून घ्या
  3. एक चमचा मधाचे सेवन करा
  4. कापलेल्या लिंबावर साखर घाला आणि ते लिंबू चोखा. उचकी लागल्यावर एकदा असे केल्याने उचकी जाते.
  5. उचकी लागल्यावर एक चमचा पीनट बटर खा
  6. उचकी लागल्यावर एक चमचा चॉकलेट पावडर खा
  7. 1 कप दह्यामद्ये मीठ मिक्स करा आणि हळूहळू खा
  8. खाली बसा आणि आपल्या गुडघ्यांना आपल्या छातीच्या शक्य तितक्या जवळ घेऊन थोडावेळ पायांना कवटाळून घ्या.
  9. पुढे झुकून तुमची छाती हळूवारपणे दाबा.

उचकी लागत असेल तर गॅस होणारे पदार्थ जसे, ढोकळा, मुळा, बटाटा असे पदार्थ खाणे टाळा. तसंच कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचे सेवन करू नका. याशिवाय कार्बोनेटेड पेय पिणे टाळा.

तशी तर उचकी आल्यानंतर काही वेळाने आपोआप जाते. परंतु, जर एखाद्या व्यक्तीला उचकी दीर्घकाळापर्यंत सतावत असेल, तर डॉक्टर औषध लिहून देऊ शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत