baby
महाराष्ट्र

दुःखद! ज्या नर्सने केली 5 हजार महिलांची प्रसूती, तिचा स्वतःच्या प्रसूतीदरम्यान झाला दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय हिंगोली येथील ज्योती गवळी (३८) या प्रसूतीसाठी लोकप्रिय परिचारिका होत्या. त्यांनी सुमारे पाच हजार महिलांची नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती यशस्वीपणे केली होती. मात्र, रविवारी त्यांच्या स्वतःच्या प्रसूतीदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. ज्योती गवळी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच रुग्णालयात शोककळा पसरली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या ज्योती गवळी या बाळंतपणासाठी सर्वाधिक पसंतीच्या नर्स मानल्या जात होत्या. ज्योती यांनी सिझेरियन पद्धतीने सुदृढ बाळाला जन्म दिला. परंतु, प्रसूतीनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. ज्योती यांचा रक्तस्त्राव काही केल्या थांबत नव्हता. त्यानंतर त्यांना नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

डॉक्टर रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होते. त्यात त्यांना काही प्रमाणात यश देखील आले होते. मात्र, ज्योतीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याअगोदरच त्यांचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत