Mediclaim

मेडीक्लेमची आवश्यकता का? मेडीक्लेमचा वापर करताना…

तब्येत पाणी ब्लॉग

मेडिक्लेम : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मेडिक्लेम पॉलिसी का काढतो?

आपल्याला एखादा आजार झाला तर त्यावरील उपचारांचा खर्च आपल्याला परत मिळावा म्हणून आपण मेडिक्लेम पॉलिसी काढतो. एखाद्या दुर्धर आजारात उपचार व शस्त्रक्रिया यांचा आपल्या आवाक्याबाहेर जाणारा खर्च करावा लागणार असेल तर आपल्याला मेडिक्लेम पॉलिसीची मदत होते. सध्या कोरोनाचं संकट आहे. साहजिकच कुणाला कधी कोरोना होईल माहित नाही. कोरोना झाल्यास त्यावरील उपचारांसाठी मेडिक्लेम पॉलिसीचा उपयोग होईल. हे सगळं आपल्याला माहित असतं. तरीही आपण जाणीवपूर्वक वैयक्तिक मेडिक्लेम काढतो का? किंवा आपल्या कंपनीने आपल्याला मेडिक्लेम देऊ केला असेल तर, त्याचे लाभ नेमके कोणते आहेत ते आपण काळजीपूर्वक पाहतो का, त्याविषयी माहिती विचारतो का? याचं उत्तर बऱ्याचदा नाही असंच येतं.

मला मेडिक्लेम हा केवळ कर वाचवण्यासाठी घ्यायचा आहे, मला मेडिक्लेम कधी लागणारच नाही हाही एक मोठा गैरसमज असतो. कंपनीने मेडिक्लेम दिलाय म्हणजे मला वेगळा घ्यायची गरज नाही हादेखील एक गैरसमज आहे. अनेक कंपन्या पाच लाखांची पॉलिसी घेतली तरी आजारानुसार त्यांनी ठरवलेली रक्कमच देतात. मग इथे उगीचच गैरसमज होतात. म्हणून नेहमी मेडिक्लेम हा विमा प्रतिनिधीकडूनच घ्यावा. म्हणजे तुम्हाला सर्व बाबी विचारून, समजून घेता येतील.

समूह मेडिक्लेम योजना असेल तर कंपनीकडून तुम्हाला मेडिक्लेम विमा मिळाला असेल तर त्यात कोणत्या सुविधा मिळणार आहेत, त्याविषयी संपूर्ण माहिती घ्या.

 1. विमा कंपन्या समूह मेडिक्लेम पॉलिसी कंपनीला दिल्यावर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यास तयार असतात. परंतु बऱ्याच कंपन्या या कार्यशाळा आयोजित करत नाहीत. तुमच्या कंपनीने कार्यशाळा घेतली नसेल तर ती घ्यायला लावा.
 2. तुम्हाला कंपनीकडून मिळालेल्या मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत दिलेले विमा कवच हे कोणत्याही आजारासाठी आहे, हे गृहित धरू नका. कोणत्या आजाराविषयी किती रक्कम मिळणार आहे, त्याविषयीची तपशीलवार माहिती मागून घ्या.
 3. काही मेडिक्लेम पॉलिसींमध्ये विम्याची संपूर्ण रक्कम कोणताही आजार किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झाली तरी पूर्णपणे दिली जाते. मात्र त्यासाठी प्रीमियम अधिक असतो हे लक्षात घ्या.

वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी असल्यास वैयक्तिक मेडिक्लेम दोन प्रकारचे असतात. झिरो डेट पॉलिसीमध्ये काही काही आजारांसाठी येणारा खर्च गृहित धरून त्याच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत. ती मर्यादा उच्चतम मर्यादाच आहे. काही वेळा एकाच रकमेच्या एकापेक्षा अधिक प्रकारच्या पॉलिसी असतात. यामध्ये गोल्ड, सिल्व्हर असे प्रकारही असल्याचे पाहायला मिळतात. गोल्ड, सिल्व्हर, प्लॅटिनम अशा पॉलिसी घेतल्यावर त्यांच्या दर्जाप्रमाणे, दिल्या जाणाऱ्या सुविधांप्रमाणे त्यांची किंमत वाढते.

कॅशलेस सुविधा का वापरावी?

अचानक शस्त्रक्रियेची वेळ आली तर तुम्हाला मिळेल त्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. परंतु शस्त्रक्रिया करायची आहे हे आधीपासून माहित असेल, ती शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असेल तर ती कधीच दिसेल त्या रुग्णालयात करू नये. ती नेहमी तुमच्या विमा कंपनीच्या यादीतील कॅशलेस सुविधा असलेल्या रुग्णालयातच करावी. अशा शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च नंतर वसूल करण्याच्या भरवशावर कधीच राहू नये. कॅशलेस सुविधा असलेल्या रुग्णालयात अशी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया होणार असेल, तर ते रुग्णालय व विमा कंपनी आपसात चर्चा करून बिल भागवतात. त्यातही पूर्वनियोजित शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्या विमा कंपनीकडून अॅप्रुव्हल घ्यावे लागते. कॅशलेस सुविधेअंतर्गत खर्चाची मर्यादा ही काही आजारांसाठी असते तर अपघातासारख्या अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी ती बऱ्याचदा नसते. उदाहरणार्थ, मोतीबिंदुसारख्या शस्त्रक्रियेसाठी खर्चाची मर्यादा असू शकते, परंतु एखाद्या मोठ्या अपघातानंतर कराव्या लागणाऱ्या उपचारांसाठी ही मर्यादा शिथिल केलेली असते.

मेडीक्लेम का काढावा ..?

 1. आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.
 2. कोण आणि केंव्हा आजारी पडेल हे माहित नाही.
 3. डॉक्टरांना पैसे मिळाल्याशिवाय ते उपचार सुरु करू शकत नाही.
 4. मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याची वेळ येऊ शकते.
 5. आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला लागले तर पुरेसे भांडवल नसल्यामुळे व्यवसाय बंद पडू शकतो.
 6. आजारी पडणं व अक्सिडेट होणं हे केव्हाही होऊ शकतं.
 7. कमी पैशात आजार बरे होतीलच असे नाही.
 8. मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत,अपघातात तुमचं आर्थिक गणित भक्कम राहतं.
 9. वेळ आली कि लक्षात येते मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची चणचण भासली नसती.

मेडिक्लेम कोण घेऊ शकतं :

 1. ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.
 2. ज्याला आपल्या घरात सुख शांती हवी आहे.

मेडिक्लेम केंव्हा घ्यावा :

जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी आपल्याला त्याचा लगेच फायदा होणार नाही.

मेडिक्लेम पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी आरोग्यविमा सल्लागार अश्विनी (९९७०३८७०३८) इथे संपर्क करू शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत