Take care while having sex after taking corona vaccine, expert advice

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करताना घ्या ‘ही’ काळजी, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या सूचना

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये यावर आजकाल बरीच चर्चा सुरु आहे. अनेकजण सोशल मीडियावर यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यापैकी एक प्रश्न हा देखील आहे कि, कोविड लस घेतल्यानंतर सेक्स करणे सुरक्षित आहे का? कितपत सुरक्षित आहे? काय काळजी घ्यायला हवी?

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नसली तरी वैद्यकीय तज्ज्ञ मात्र यासंदर्भात काही सूचना देत आहेत. तज्ञांनी असे सुचवले आहे की पुरुष आणि स्त्रियांनी लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर गर्भनिरोधक वापरावे आणि या काळात कुटुंब नियोजन करणे टाळावे. याकाळात बाळासाठी प्रयत्न करणे टाळावे.

कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक वर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, “या लसीचे दीर्घकालीन दुष्परिणाम आहेत का आणि लैंगिक संबंधानंतर लोकांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, हे सांगणे सध्यातरी अवघड आहे.” ज्या लोकांना लस दिली गेली आहे ते प्रत्येक वेळी लैंगिक संबंध टाळू शकत नाहीत, म्हणूनच सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग काळजी घेणे हा आहे.

डॉक्टरांनी सांगितले की कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर पुरुष आणि स्त्रियांनी किमान 2 ते 3 आठवड्यांपर्यंत कंडोमसारख्या गर्भनिरोधकांचा वापर केला पाहिजे. हे आवश्यक आहे, कारण सेक्स दरम्यान शरीरातील द्रव (body fluids) एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कंडोम वापरणे सर्वात उत्तम आणि प्रभावी ठरेल. तसेच त्यांनी पुढे असा सल्ला दिला की महिलांनी लस घेण्यापूर्वी स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.

कोवॅक्सीनची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी अद्याप सुरू आहे आणि यामध्ये स्वयंसेवकांना तीन महिन्यांपर्यंत सेक्स दरम्यान कंडोम वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच पुरुष स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत शुक्राणूंचे दान (स्पर्म डोनेट) करू नये, असे सांगण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत