some important things to know about white discharge

‘व्हाईट डिस्चार्ज’ शी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

तब्येत पाणी ब्लॉग महिला विशेष लाइफ स्टाइल

‘व्हाईट डिस्चार्ज’ म्हणजेच योनीतुन येणारा पांढरा स्त्राव, त्याला पांढरे पाणी देखील म्हणतात. यासंदर्भात स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न आणि गैरसमज असतात. कधीकधी पांढरा स्त्राव हा आजार आहे, असादेखील समज असतो, परंतु असं नाहीये. जशी मासिक पाळी महत्वाची असते, तसाच पांढरा स्त्राव देखील महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. ‘व्हाईट डिस्चार्ज’ सामान्यत: मुलींच्या पहिल्या मासिक पाळीनंतर सुरू होतो. त्यानंतर दर महिन्यात मासिक पाळीच्या अगोदर आणि नंतर होणारा व्हाईट डिस्चार्ज सामान्य मानला जातो.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हाईट डिस्चार्ज नैसर्गिकरित्या योनी स्वच्छ ठेवतो. यामुळे लैंगिक संसर्ग रोखण्यास मदत होते. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि निरोगी योनीचे लक्षण आहे. पीरियड सर्कल दरम्यान बहुतेक महिलांमध्ये अनेक प्रकारचे व्हाईट डिस्चार्ज होतात. तो घट्ट किंवा पातळ स्वरूपात असू शकतो. त्याचा रंग पांढरा असेल आणि त्याला वास येत नसल्यास ते सामान्य असते. कधीकधी ते हलक्या पिवळ्या रंगाचे देखील असू शकते. बऱ्याचदा याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते.

व्हाईट डिस्चार्जमुळे होणारा ओलेपणाचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही लाइनर पॅन्टी घालायला सुरुवात केली पाहिजे. ह्या पॅन्टी अतिरिक्त ओलेपणा शोषून घेतात आणि आरामदायक वाटतात.

व्हाईट डिस्चार्ज संसर्गामुळे होत असेल तर…

  1. व्हाईट डिस्चार्जचा रंग बदलून पिवळसर, हिरवा किंवा गुलाबी झाला असेल आणि त्याला दुर्गंधी येत असेल तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, कारण हे संक्रमणाचे (infection) लक्षण असू शकते. (बॅक्टेरिया, यीस्ट, STD इ.)
  2. उत्तेजित झाल्यानंतर देखील स्त्राव होण्याचे प्रमाण वाढते, जे योनीला ओलसर ठेवते आणि लैंगिक संबंधादरम्यान नैसर्गिक वंगण म्हणून कार्य करते.
  3. जास्त प्रमाणात डिस्चार्जसह जळजळ आणि खाज सुटत असल्यास, याचा अर्थ असा आहे की आपल्या खाजगी भागास इन्फेक्शन झाले आहे आणि त्याला उपचारांची आवश्यकता आहे.
  4. प्रेग्नन्सी दरम्यान सौम्य वासासह पांढरा दुधासारखा स्त्राव सामान्य गोष्ट आहे. प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल बदलांमुळे स्त्राव जास्त असतो. विशेष म्हणजे याचा एक फायदा देखील असतो. हा स्त्राव आपल्याला मूत्रमार्गाच्या संसर्गापासून वाचवतो.
  5. योनिमार्गाचा संसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. योनी सुगंधित साबणाने किंवा बॉडी वॉशने साफ करू नका, कारण यामुळे योनीतील पीएच संतुलन बिघडते. कॉटन पेंटी परिधान करणं केव्हाही चांगलं. आपल्या जेवणात फळे आणि दही देखील समाविष्ट करा. कारण ते आपल्या शरीरात तयार झालेल्या ऍसिड्सचा प्रभाव कमी करतात.

व्हाईट डिस्चार्ज योग्य असेल तर काहीच हरकत नाही परंतु कधीकधी तो संसर्गामुळे देखील होतो. जर व्हाईट डिस्चार्जचे प्रमाण जास्त असेल आणि त्याला वास येत असेल तर ते यीस्ट इन्फेक्शनमुळे असू शकते. या संसर्गामुळे योनीत खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांकडे जाणे महत्वाचे असते. डॉक्टरांपुढे योग्य पद्धतीने आपल्या समस्या मांडणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नयेत यासाठी डॉक्टरांची भेट अवश्य घ्यावी. डॉक्टर सर्व लक्षणांमागील नेमके कारण शोधून काढून प्रभावीपणे आपल्या समस्येवर उपचार करू शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत