after 14 years matchbox price revised now available in 2 rupees per unit from december 1
देश

काडीपेटीलाही बसला महागाईचा चटका, तब्बल १४ वर्षांनंतर वाढणार किंमत

पुणे : काडीपेटी आता एक रुपयात मिळणार नाही. आता काडीपेटीला महागाईचा चटका बसला असून तब्बल १४ वर्षांनंतर त्याचे भाव वाढणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशातील मुख्य काडीपेटी उद्योग शिवकाशीमध्ये चालतो. काडीपेटी उद्योगात गुंतलेल्या 5 मोठ्या कंपन्यांनी आता महागाईशी झुंज देत काडीपेटीची किंमत वाढवण्यास सहमती दर्शविली आहे. वृत्तानुसार देशभरात अवघ्या 1 रुपयात उपलब्ध असलेला माचिस बॉक्स 1 डिसेंबरपासून 2 रुपयांना मिळेल.

काडीपेटीची किंमत यापूर्वी 2007 साली वाढवण्यात आली होती. त्यानंतर 50 पैशांची काडीपेटी १ रुपयाला झाली होती. शिवकाशी येथील ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसने तब्बल 14 वर्षांनंतर काडीपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मॅचबॉक्स उद्योगाशी संबंधित प्रतिनिधी म्हणतात की माचिस तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाशी संबंधित 14 वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. माचिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल फॉस्फरसचा दर ४२५ रुपयांवरून ८१० रुपये किलो झाला आहे. मेणाची किंमत 58 रुपयांवरून 80 रुपये झाली आहे, तर  माचिसच्या डबीची किंमत 36 रुपयांवरून 55 रुपये झाली आहे. याशिवाय कागद, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फेटच्या किमतीही १० ऑक्टोबरपासून सातत्याने वाढत आहेत. वरून डिझेलच्या किंमतीचा भार वेगळाच आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत