मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.
राज ठाकरेंना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व दौरे रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ते घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे आजारी असल्याने त्यांनी पुणे दौऱ्यासह अन्य नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.




