A new strain of corona virus was found in 20 passengers returning to India from Britain

ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये आढळला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन

देश

ब्रिटनहून भारतात दाखल झालेल्या प्रवाशांपैंकी अनेक जण बेपत्ता असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे. आत्तापर्यंत ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला आहे. मंगळवारी ही संख्या ६ वर होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

२५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात ब्रिटनहून जवळपास ३३ हजार प्रवाशी भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबादच्या लॅबमध्ये करण्यात आलेल्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग’नंतर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची माहिती मिळाली आहे. ७० टक्के अधिक वेगानं या कोरोना विषाणूचं संक्रमण पसरत असून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण भारतासहीत डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रान्स, स्वीडन, स्वित्झरलँड, स्पेन, कॅनडा, जर्मनी, लेबनान, जपान, सिंगापूर या देशांमध्येही आढळले आहेत.

चिंताजनक : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव

आतापर्यंत ब्रिटनहून आलेल्या ११४ जणांना कोरोनासंसर्ग झाल्याचं निदान झालं असून त्यांच्या नाकातील स्रावाचे नमुने प्राधिकृत प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातही नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण सापडला आहे. आंध्र प्रदेशात ४७ वर्षीय महिलेत करोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर राज्यात हायअलर्टची स्थिती आहे. पुणे प्रशासन गेल्या १५ दिवसांत ब्रिटनहून परतलेल्या १०९ जणांचा अद्याप शोध घेत आहे. यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जातेय. पुणे प्रशासनाच्या प्रोटोकॉलनुसार, पश्चिम आशिया आणि युरोपियन देशांतून परतलेल्या सर्व प्रवाशांना आपापल्या खर्चावर सात दिवसांपर्यंत जवळच्या हॉटेलमध्ये इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत