अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अभिनेत्री कंगना रणौत नेहमी बोलत असते. दरम्यान, भाजपाचे नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विटवर बोलताना “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर अभिनेत्री कंगना रणौतनं दिलं होतं. इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलीस नको प्लिज,” असंही कंगना म्हणाली होती.
आता कंगनाला काँग्रेसनं सल्ला दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून तुम्ही राम कदम यांच्यापासून घाबरून राहायला हवं, असं म्हटलं आहे. “कंगनाजी खरंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे आभार मानले आहेत, त्याच्यापासूनच घाबरून राहायला हवं. मुलींसाठी ती व्यक्ती फार धोकादायक आहे,” असं ट्विट करून सावंत यांनी कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे.
Well @KanganaTeam , actually you should be scared of the person whom you are thanking. Very dangerous for girls! https://t.co/EOkhMRlGDG
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2020




