Central government decision to allow all private hospitals for corona vaccination

कोरोना लसीकरणासाठी सरकारी-खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय

कोरोना देश

लखनऊ : कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून सुट्टी देण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं जाहीर केलंय.  तर इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा पुढच्या रविवारपर्यंत अर्थात ४ एप्रिलपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.  माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस टोचून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या दिवशी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस वाढत चाललेलं करोना संक्रमण ध्यानात घेता राज्य सरकारनं इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा पुढच्या रविवारपर्यंत अर्थात ४ एप्रिलपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील, परंतु इथे करोना प्रोटोकॉलचं पालन करणं आवश्यक राहील.

आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात ६ लाख १५ हजार ९९६ रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यात ९१९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५ लाख ९८ हजार ००१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात एव्हाना करोनामुळे ८८०० रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत