62 year old woman raped stabbed 25 times by man
क्राईम देश

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

तामिळनाडू : तामिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 1 जुलै रोजी घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आणि गुरुवारी रात्री तीन अल्पवयीन मुलांना अटक केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी शाळेत दहावीत शिकणारी मुलगी मे महिन्यात तिच्या पालकांना न सांगता तिच्या इयत्ता बारावीतील मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला शाळेच्या आवारात गेली होती. यावेळी मुलीच्या तीन वर्गमित्रांनी त्यांच्या मोबाइल फोनवर वाढदिवसाचा व्हिडिओ शूट केला होता. या मुलांनी तिला 1 जुलै रोजी ही घटना तिच्या पालकांना सांगण्याची धमकी दिली. पीडितेने तिघांना क्लिप हटविण्याची विनंती केली, परंतु त्यांनी कथितपणे दावा केला की मोबाइल फोन त्यांच्या घरीच आहे. असे सांगून या तीन मुलांनी 1 जुलै रोजी मुलीला त्यांच्यापैकी एकाच्या घरी नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचे देखील त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ शूट केले आणि ही घटना कोणाला सांगितल्यास ती क्लिप फिरविण्याची धमकी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर ही मुलगी खूप घाबरली होती आणि तिने शाळेत जाण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर तिच्या पालकांना ही घटना कळली आणि त्यांनी तक्रार दाखल केली. गुरुवारी रात्री आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची कारागृहाऐवजी निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यासाठी पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत