The husband was walking on the street with his wife's severed head in his hand
ग्लोबल

भयंकर! अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या, धडावेगळं केलेलं शीर घेऊन फिरत होता रस्त्यावर…

इराण : अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, आपल्या पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन ही व्यक्ती रस्त्यावर फिरत होती. काही कॅमेऱ्यांनी हे भयंकर कृत्य टिपलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इराणमधून ही अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पत्नीचं शीर हातात घेतलेल्या या व्यक्तीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्यक्तीच्या दुसऱ्या हातात चाकू होता. मृत महिलेचं नाव मोना हैदरी आहे. इराणची वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ने दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मोना हैदरीची हत्या तिचा पती आणि दीराने केली. दक्षिण पश्चिम शहर अहवाज मध्ये ही घटना घडली. घटनेनंतर दोन्ही आरोपी लपून बसले होते. या घटनेची माहिती मिळताच सोमवारी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली.

इराणमध्ये विवाहासाठी मुलींचं वय कमीत कमी १३ वर्ष असावं, असं कायदेशीररित्या निश्चित करण्यात आलेलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी इराणमध्ये  सामाजिक आणि कायदेशीर सुधारणेची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत