brazilian singer mc kevin falls to death
ग्लोबल

प्रसिद्ध गायक केव्हिनचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, दोन आठवड्यांपूर्वीच केलं होतं लग्न

ब्राझील : ब्राझीलचा प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय केविन ब्राझीलच्या रिओ दि जानेरो मधील हॉटेलमध्ये थांबला होता. ही घटना 16 मे रोजी घडली. पोलिसांनी केव्हिनच्या पाचव्या मजल्यावरून पडण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

केव्हिन हॉटेलच्या 11 व्या मजल्यावर थांबलेला होता. तो पाचव्या मजल्यावर त्याच्या काही मित्रांना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेला होता. केव्हिन हॉटेलच्या बाल्कनीत उभा होता, जिथून तो खाली पडला. घटनास्थळी पोहोचलेल्या एका पथकाने या अपघातानंतर केव्हिनला ताबडतोब रुग्णालयात नेले, परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन आठवड्यांपूर्वीच केव्हिनने त्याची मैत्रीण डियोलेन बेजेराशी लग्न केले होते. डियोलेन ही क्राईम वकील आहे. केव्हिनच्या निधनानंतर डियोलेनने त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली. डियोलेनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तु माझ्या जीवनातील प्रेम आहेस आणि नेहमीच राहशील. मला सर्वात जास्त प्रेम आणि आदर देणारा माणूस. देवाकडे जा, मी तुझ्यावर कायम प्रेम करीन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Deolane Bezerra (@dra.deolanebezerra)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत