इंदौर : मध्य प्रदेशमधील इंदौर शहरातील एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाचा पाय कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुतरडल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे.
महाराजा यशवंतराव चिकित्सालयचे अधीक्षक प्रमेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये लहान मुलांची देखभाल करण्यासाठी जो कक्ष आहे तिथे एका बाळाचा पाय उंदाराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला. १९ दिवसांच्या बाळाची टाच आणि अंगठा उंदराने कुरतडला असून या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे. मात्र या बाळाला झालेल्या जखमा किती गंभीर आहेत यासंदर्भातील माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्री मॅच्यूअर बेबी असून बाळाचं वजन फक्त १.४ किलो आहे. या बाळाला वॉर्मर म्हणजेच उष्ण काचेच्या पेटीत ठेवलेलं होतं. सकाळी बाळाची आई दूध पाजण्यासाठी गेली, तेव्हा तिला बाळाच्या पायांना जखमा असल्याचं आढळलं. प्लॅस्टिक सर्जनने बाळाची तपासणी केली. त्यावेळी बाळाचा पाय उंदाराने कुतरडल्याचं स्पष्ट झालं. या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत.
मुंबईच्या समुद्रात अडकलेले भारतीय जहाज P-305 बुडाले, 130 पेक्षा अधिकजण बेपत्ता
दोन मोटारसायकल समोरासमोर धडकून भीषण अपघात, दोघांचा मृत्यू




