फरीदकोट : पंजाबच्या फरीदकोटमधील भोलूवाला रोडवर अतिशय भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मोटारसायकल चालक ठार झाले असून दुचाकीवर बसलेला एक छोटा मुलगा बचावला आहे. विशेष म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा पूर्ण रस्ता रिकामा होता. हा अपघात इतका भयंकर होता की जगदीप सिंह (वय 27 वर्ष) आणि किक्करसिंह (वय ४५) हे जागीच मरण पावले. हा अपघात तेथे जवळच असणाऱ्या एका फॅक्टरीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन्ही दुचाकींचा वेग खूप जास्त होता आणि हा रस्ता अरुंद आहे. तसेच यापैकी एक दुचाकीस्वार मागे वळून पाहात होता, त्यामुळे हा अपघात झाला. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली, दोघांनाही सावरण्याची संधीच मिळाली नाही. हे दोघे जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुलगा जगदीप सिंह हा लॅब टेक्निशियन म्हणून काम करायचा. तो आपल्या पत्नीला गावी सोडून शहरात निघाला होता. समोरून येणार्या दुसर्या दुचाकीशी त्याची समोरासमोर टक्कर झाली आणि दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पोलीस अपघाताच्या ठिकाणी तपासणी करत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. लोकांनी मागणी केली आहे की हा रस्ता रुंदवण्यात यावा, जेणेकरून असे अपघात टाळता येतील.
भयंकर : दारूच्या नशेत केली अनोळखी व्यक्तीची हत्या, अगोदर गळा आवळला नंतर चिरला, मग जिवंत जाळलं
धक्कादायक : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली आणि अनर्थ घडला..




