भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी एक अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार रविवारी (23 मे) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सुविधा 14 तास बंद असणार आहे. बँकिंग नियामकाने अधिसूचनेत म्हटले आहे की शनिवारी (22 मे) बिझनेसची वेळ संपल्यानंतर, NEFT सुविधा तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड करून कार्यक्षमता आणि लवचीकता वाढविण्यासाठी हे करण्यात येणार आहे.” त्यानुसार, रविवारी (23 मे 2021) NEFT सेवा 00:01 वाजेपासून सकाळी 14:00 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही.
आरबीआयने सांगितले आहे कि, “सदस्य बँका त्यांच्या ग्राहकांना या वेळेनुसार पेमेंट ऑपरेशन्स करण्यास सांगू शकतात.
NEFT System Upgrade – Downtime from 00.01 Hrs to 14.00 Hrs. on Sunday, May 23, 2021https://t.co/i3ioh6r7AY
— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2021
रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटले आहे की या कालावधीत रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु राहील. आरबीआयने आरटीजीएससाठी तत्सम तांत्रिक अपग्रेड 18 एप्रिल रोजी पूर्ण केले होते.




