lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice

महागाईने कंबरडे मोडले! महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ

अर्थकारण देश

नवी दिल्ली : वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. आजपासून कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर आता उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2101 रुपयांवर पोहोचली आहे. 100 रुपयांच्या वाढीनंतर कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2177 रुपयांवर पोहोचली आहे, तर मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2051 रुपयांना विकला जात आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑक्टोबरमध्ये या किमती वाढवण्यात आल्या होत्या. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये घरगुती गॅसची किंमत 926 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 915.5 रुपये आहे.

आपण घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तपासण्यासाठी सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जाऊ शकता. इथे कंपन्या दर महिन्याला नवे दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx इथे जाऊन तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचा दर तपासू शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत