Minor Girl Of BJP Leader Tortured Raped And Murdered In Ranchi
क्राईम देश

नात्याला काळिमा! जन्मदात्या वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील काकोरी येथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या वडिलांनी आपल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. गेल्या सहा महिन्यांपासून हा नराधम बाप त्याच्या मुलीवर बलात्कार करत होता. जेव्हा-जेव्हा आई घराबाहेर जायची तेव्हा प्रत्येकवेळी वडिलांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मुलीच्या आईला हा प्रकार समजताच, तिने धाडस दाखवत आरोपी पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काकोरी परिसरातील रहिवासी असून तो मजुरीचे काम करतो. महिलेने पोलिसांना सांगितले की, ती जेव्हा तिच्या पालकांच्या घरी गेली होती, तेव्हा पतीने पहिल्यांदा हा गुन्हा केला. तेव्हापासून तो संधी पाहून पुन्हा पुन्हा मुलीवर अत्याचार करत आहे. तो इतर तीन लहान मुलींना खेळायला बाहेर पाठवून हे घृणास्पद कृत्य करत राहिला. दरम्यान, पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी वडील आपल्या मुलीला बलात्कारानंतर मारहाण करायचा आणि कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी द्यायचा. मुलीला हा प्रकार कोणालाही सांगायला भीती वाटत होती. परंतु, आईने मुलीला विचारले असता तिने सर्व काही उघडपणे सांगितले. हा प्रकार वडिलांना समजताच त्यांनी पुन्हा मुलीला आणि तिच्या आईला मारहाण केली. या प्रकरणावर एडीसीपी दक्षिण राजेश श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मुलीची तक्रार आली होती. ज्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत