environmentalist Sunderlal Bahuguna dies due to corona
देश

दुःखद : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

ऋषिकेश : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे आज दुपारी १२ वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ऋषिकेश येथे दाखल झालेल्या पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना कोविड न्यूमोनिया झाला होता. CPAP मशीन सपोर्टवर त्यांची ऑक्सिजन पातळी 86 टक्क्यांपर्यंत आली होती. परंतु, डॉक्टर त्यांची रक्तातील साखरेची पातळी आणि ऑक्सिजन पातळी व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्यांना मधुमेहाचा त्रास होता. मात्र, आज त्यांचे निधन झाले.

सुंदरलाल बहुगुणा यांनी 1972 मध्ये चिपको चळवळीला चालना दिली. त्यांनी देश आणि जगाला जंगलाचे संरक्षण करण्यास प्रेरित केले. चिपको चळवळीचा परिणाम जगभर दिसून आला होता. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने समृद्ध असलेल्या बहुगुणा यांचे नद्या, वने आणि निसर्गाशी गहन नटे होते. त्यांनी पर्यावरणाला सर्वात मोठी अर्थव्यवस्था मानली. हेच कारण आहे की उत्तराखंडमधील विजेची गरज भागविण्यासाठी त्यांनी छोट्या प्रकल्पांना पसंती दिली. म्हणूनच ते टिहरी धरणासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या बाजूने नव्हते. यासह त्यांनी भव्य आंदोलन सुरू केले आणि जनजागृती केली.

‘धार ऐंच डाला, बिजली बणावा खाला-खाला’ अशी त्यांची घोषणा होती. म्हणजेच, उंच-उंच ठिकाणी झाडे लावा आणि खालच्या ठिकाणांवर छोट्या प्रकल्पांतून वीज तयार करा. साध्या जीवनाची सोपी कल्पना अंगीकारत त्यांनी आयुष्यभर निसर्ग, नद्या व जंगलांच्या रक्षणासाठी मोहीम चालूच ठेवली. बहुगुणा यांनीच चांगल्या आणि वाईट वनस्पतींमध्ये फरक करायला देखील शिकवला होता. ते एक महान व्यक्तित्वाचे धनी होते.

वायुसेनेचं लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त, वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत