नवी दिल्ली : आता देशभरातील इंडियन ऑईलच्या 30 हजार पेट्रोल पंपांवर मोजमाप करण्यात कोणतीही फसवणूक होणार नाही. इंडियन ऑइल (IOCL) ने अशा प्रणालीचा दावा केला आहे की ज्याद्वारे सर्व पेट्रोल पंपांचे केंद्रीय पातळीवर परीक्षण म्हणजेच मॉनिटरिंग केले जाईल.
सरकारी तेल कंपनी IOCL ने ग्राहकांची धास्ती दूर करण्यासाठी देशभरातील 30 हजाराहून अधिक पंप स्वयंचलित (ऑटोमॅटिक) केले आहेत. कंपनीने दावा केला आहे की यामुळे ग्राहकांकडून योग्य किंमत आकारली जाईल. तसेच पेट्रोल आणि डिझेलही पूर्ण उपलब्ध होतील. इतकेच नाही तर जेव्हा ग्राहक आपल्या गाडीत तेल भरण्यासाठी येईल, तेव्हा याची खात्री असेल की मीटर शून्यापासूनच सुरू होईल.
देशभरातील बरेच ग्राहक तक्रारी करत असतात की पेट्रोल पंपांवर त्यांच्याबरोबर फसवणूक केली जाते. पंप मालक कमी तेल वितरीत करण्यासाठी विविध तंत्राचा अवलंब करतात. अशा तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी इंडियन ऑइल आता पंपांची रिअल टाइम मॉनिटरिंग सुनिश्चित करणार आहे. कंपनीने ट्विटरवर याबाबत माहिती देताना म्हटले आहे की पेट्रोल पंपावर उपस्थित सर्व्हरवर मॉनिटरिंगची पुष्टी केली गेली आहे. डिस्पेंसर मशीनने करण्यात येणारे प्रत्येक वितरण शून्यापासून सुरू करण्याची खात्री आहे. ग्राहकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कंपनीने मोठा पुढाकार घेतला आहे.
Proud to announce that over 30,000 #IndianOil petrol pumps are now automatic. Ensuring correct quantity and correct price charged, through real time monitoring at server available at petrol pump. Each new delivery from dispenser is ensured to start from Zero. pic.twitter.com/2BdNUkMTrq
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) July 13, 2021




