नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल शर्मा १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते.
यशपाल शर्मा हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांनी विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात 89 धावांचा शानदार डाव खेळला, ज्यामुळे टीम इंडियाने सामना जिंकला होता. याशिवाय, सेमीफायनलमध्ये त्यांनी 61 धावा केल्या होत्या, त्या सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले होते.
यशपाल शर्मा यांनी भारताकडून एकूण 37 कसोटी सामने खेळले होते. ज्यात त्यांनी 34 च्या सरासरीने 1606 धावा केल्या. त्याचबरोबर त्यांनी एकूण 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 883 धावा केल्या होत्या.
Former Indian cricketer and member of the 1983 World Cup-winning team, Yashpal Sharma passes away due to cardiac arrest on Tuesday. pic.twitter.com/8l9zgu1Iaa
— All India Radio Sports (@akashvanisports) July 13, 2021




