Rs 5 lakh notes missing from Nashik currency note press

मोठी बातमी! नाशिक करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब

नाशिक महाराष्ट्र

नाशिक : नाशिक करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली होती. मात्र, कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही पाच लाखांच्या नोटा गायब झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सोमवारी मुद्रणालयातील अधिकारी उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

करन्सी नोट प्रशासनाने या प्रकरणाची अंतर्गत गोपनीय चौकशी करुनही पाच लाखांचा तपास लागला नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, कडेकोट बंदोबस्तात नोटछपाई सुरु असतानाही नोटा गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. यामागे मोठा घोटाळा असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था असलेल्या करन्सी नोट प्रेसमधून ही चोरी झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नाशिक प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या नोटांची छपाई होते. नाशिक प्रेसमध्ये दिवसाला १५ ते १८ दशलक्ष नोटांची छपाई होते. नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. दरम्यान, ५०० रुपयांच्या नोटांचे १० बंडल गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत