रडणे तसे कुणालाच आवडत नाही, परंतु, जीवनात प्रेमाचे आणि दुःखाचे असे अनेक प्रसंग येतात जेव्हा लोकांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. अश्रूंचा संबंध आपल्या मनस्थितीशी असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू का येतात? डोळ्यात अश्रू येण्याचे कारण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. चला तर याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात…
माणसाच्या डोळ्यांतून अश्रू केवळ दु:खात, संकटात किंवा अतिसुखाच्या प्रसंगीच येतात असे नाही, ते एखाद्या विशिष्ट वासामुळे किंवा चेहऱ्यावर जोरदार वारा लागल्यामुळेही येतात. याशिवाय कांदा कापताना अश्रू येणे ही सामान्य गोष्ट आहे.
सामान्यतः जेव्हा आपण डोळे मिचकावतो तेव्हा पापणी आपल्या डोळ्याभोवती अश्रू पसरवते आणि श्लेष्मा अश्रू डोळ्याला चिकटून ठेवण्यास मदत करते. उरलेले अश्रू नाकातून जाणार्या विशेष ड्रेनेज सिस्टमद्वारे वाहून जातात.
परंतु, जेव्हा आपण रडतो तेव्हा खूप जास्त अश्रू येतात, जे डोळे धरून ठेवू शकत नाहीत आणि डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागतात. याचे कारण असे की सर्वात मोठी अश्रू ग्रंथी सुरु होते आणि एका छोट्या कारंज्याप्रमाणे एकाच वेळी भरपूर अश्रू निर्माण करू शकते.
शास्त्रज्ञांनी मुख्यतः अश्रूंची वर्गवारी तीन प्रकारात केली आहे.
- अश्रूंची पहिली श्रेणी म्हणजे बेसल. हे नॉन इमोशनल अश्रू असतात, जे डोळ्यांना कोरडे होण्यापासून वाचवतात आणि निरोगी ठेवतात.
- दुस-या श्रेणीमध्ये देखील नॉन इमोशनल अश्रूच समाविष्ट आहेत. हे अश्रू एखाद्या विशिष्ट गंधाच्या प्रतिक्रियेतून येतात, जसे की कांदा कापल्यामुळे किंवा फिनाईलसारख्या तीव्र वासामुळे अश्रू येतात.
- यानंतर अश्रूंची तिसरी श्रेणी येते ज्याला Crying Tears म्हणतात. रडल्याने येणारे अश्रू भावनिक प्रतिक्रिया म्हणून येतात. वास्तविक, मानवी मेंदूमध्ये एक लिंबिक प्रणाली असते, ज्यामध्ये मेंदूचा हायपोथॅलॅमस असतो. हा भाग मज्जासंस्थेच्या थेट संपर्कात असतो. या प्रणालीचा न्यूरोट्रांसमीटर एखादी भावना अनावर झाल्याने सिग्नल देतो आणि आपण रडू लागतो. माणूस फक्त दुःखातच नाही तर रागाने किंवा भीतीनेही रडू लागतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात.
कांदा चिरताना अश्रू का येतात?
डोळ्यात पाणी येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कांद्यामध्ये असलेले रसायन. त्याला सिन-प्रोपॅन्थिल-एस-ऑक्साइड म्हणतात. कांदा कापल्यावर त्यात असलेले हे रसायन डोळ्यातील अश्रू ग्रंथीला उत्तेजित करते, त्यामुळे डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.
रडण्याचे अनेक फायदे
रडण्याचे अनेक फायदे आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. थोड्या वेळासाठी रडणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्ही तणावापासून मुक्त होऊ शकता. तसेच रडताना डोळ्यांना आणि पापण्यांना तरलता मिळते.
आपल्या डोळ्यांना व्यवस्थित काम करण्यासाठी अश्रू आवश्यक आहेत. डोळ्यात विशेष ग्रंथी असतात, ज्या दिवसभर अश्रू बनवण्याचे काम करतात. सामान्यतः या ग्रंथी फक्त थोड्या प्रमाणात अश्रू निर्माण करतात, म्हणजेच दररोज अर्ध्या चमचापेक्षा देखील कमी. अश्रू म्हणजे बरेचसे पाणी आणि थोडेसे मीठ असतात, परंतु त्यात काही तेल, श्लेष्मा आणि एन्झाईम नावाची रसायने देखील असतात, जी जंतूंना नष्ट करतात.
अंड्यांसोबत ‘या’ गोष्टी खाणे प्रकृतीला हानिकारक, जाणून घ्या आणि काळजी घ्या…
रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा झोप आणि आरोग्य दोन्ही होईल खराब




