अंडी अतिशय लोकप्रिय आणि पौष्टिक अन्न आहे. अंडी जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि चरबीने समृद्ध असतात. अंडी परवडणारी आणि सहज उपलब्ध आहेत, बरेच लोक नियमितपणे किंवा अगदी दररोज अंडी खातात. परंतु, अंडी खाताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. अंडी खाताना योग्य ती काळजी घेतल्यास शरीराला त्यातून अनेक फायदे मिळण्यास मदत होते.
अंड्यांसोबत ‘या’ गोष्टी खाणे टाळा
अंड्यांसोबत आंबट पदार्थांचे सेवन
अंड्यांवर लिंबू, चाट मसाला, आमचूर पावडर टाकून खाल्ल्यास ते नक्कीच चवदार लागते, पण ते आरोग्यासाठी चांगले नाही. अंड्यांसोबत आंबट पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.
अंडी आणि पनीर
अंडी आणि पनीर हे दोन्ही प्रथिनांचे (protein) उत्कृष्ट स्रोत आहेत, परंतु दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे लूज मोशन किंवा बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
अंडी आणि केळी
आपण बॉडी बनवण्यासाठी अंडी आणि त्यानंतर लगेच केळी खात असाल, तर ही सवय बदला. कारण त्यामुळे गॅस तर निर्माण होतोच, पण आतड्यांसंबंधीच्या समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
अंडी आणि चहा
अंड्यासह चहा पिण्याची चूक करू नका, कारण त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागू शकतो, तसेच पचनक्रिया बिघडून अनेक दिवस त्रास होऊ शकतो. त्यामुळे अंडी आणि चहा या दोन्हींचे कॉम्बिनेशन चांगले नाही.
उकडलेली अंडी आणि मासे
उकडलेली अंडी आणि मासे एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. ही ऍलर्जी धोकादायक रूप देखील घेऊ शकते, त्यामुळे हे कॉम्बिनेशन खाणे टाळा.




