world stroke day habits that could increase risk of stroke

World Stroke Day : काळजी घ्या! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी वाढवू शकतात स्ट्रोकचा धोका

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

World Stroke Day : लोकांना स्ट्रोकच्या लक्षणांबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हा आहे की लोकांना स्ट्रोकपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे माहित असायला हवे, जेणेकरून त्यांना वेळेवर उपचार मिळू शकतील. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या मते, दरवर्षी 17 दशलक्ष लोकांना स्ट्रोकचा त्रास होतो, त्यापैकी 6 दशलक्ष व्यक्ती मरण पावतात तर 5 दशलक्ष व्यक्ती कायमच्या विकलांग होतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्ट्रोकचा धोका वाढवणारे अनेक घटक आहेत, ज्यामध्ये जास्त वजन किंवा लठ्ठपणा, शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणे, भरपूर दारू पिणे, ड्रग्सचा अतिवापर, सिगारेट ओढणे, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, स्लीप एपनिया, हृदयाशी संबंधित आजार स्ट्रोकची शक्यता वाढवू शकतात. आपल्या सवयी आणि जीवनशैली याचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. निरोगी सवयी स्ट्रोकचा धोका नक्कीच कमी करतात. अशा परिस्थितीत कोणत्या सवयी स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या  दैनंदिन सवयी :

  • आहारात जास्त मीठ :
    जे लोक आहारात जास्त मीठ वापरतात किंवा सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि कोलेस्टेरॉलयुक्त आहार घेतात त्यांना स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका जास्त असतो. पॅकिंग आणि डबाबंद खाण्यामध्ये मीठ आणि नायट्रेट प्रिझर्व्हेटिव्ह्ज देखील लक्षणीय प्रमाणात असतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
  • खराब जीवनशैली :
    ज्या लोकांची शारीरिक हालचाल कमी असते किंवा जे दररोज व्यायाम करत नाहीत, त्यांनाही पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचा धोका वाढतो, ज्यामुळे भविष्यात स्ट्रोकची शक्यता देखील वाढते.
  • दारू पिणे :
    जर तुम्ही अनेकदा मद्यपान करत असाल, तर आता थांबण्याची वेळ आली आहे, कारण यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. जास्त मद्यपान केल्याने रक्तदाब वाढतो आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.
  • धूम्रपान आणि तंबाखूचा वापर :
    धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन केल्याने पक्षाघाताचा धोका वाढतो. सिगारेट ओढल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • झोपेचा अभाव :
    जर तुम्हाला अनेकदा पुरेशी झोप मिळत नसेल किंवा नीट झोप येत नसेल, तर हेदेखील स्ट्रोकसाठी एक मोठे कारण ठरते.

स्ट्रोकची लक्षणे :

  • स्ट्रोकचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अचानक अशक्तपणा वाटणे. चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणे, बहुतेकदा शरीराची एक बाजू अशक्त वाटते.
  • बोलण्यात किंवा समजण्यात अडचण.
  • एक किंवा दोन्ही डोळ्यांनी पाहण्यास त्रास होतो.
  • श्वास घेण्यात समस्या
  • चक्कर येणे, चालताना त्रास होणे, संतुलन किंवा समन्वय गमावणे आणि अचानक पडणे.
  • शुद्ध हरपणे.
  • अचानक आणि तीव्र डोकेदुखी.

अशा लक्षणांचा अनुभव आल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. अशा वेळी लवकरात लवकर उपचार मिळणे आवश्यक असते.

स्ट्रोक टाळण्यासाठी :

  • धूम्रपान सोडा
  • अल्कोहोलचा मर्यादित वापर
  • उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा
  • मधुमेह व्यवस्थापन करा
  • वजनावर लक्ष ठेवा
  • आरोग्यवर्धक खा
  • दिवसातून 30 मिनिटे व्यायाम करा

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत